Manoj Jarange Patil latest News:- सरकारकडून पाटलांचे उपोषण तोडण्याचा प्रयत्न पाटलांना संपवण्याचे षडयंत्र समजून घ्या…

Manoj Jarange Patil latest News अंतरवाली सराठी -मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आज चौथा दिवस आहे. आज संपुर्ण बिडसह महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. आज फक्त आरोग्य सेवा सोडून सर्व शाळा, महाविद्यालय, बससेवा, दुकाना सर्व बंद पुकारण्यात आले आहे.

काल पाटील संतापले जिल्हा अधिकार्याला म्हणाले…

काल रात्री  विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जालन्याचे जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. आणि ते म्हणाले कायदा पास करण्यासाठी 25 फेब्रुवारी तारीख दिली आहे.

या गोष्टी वर पाटील संतापले म्हणाले तुम्ही काय मराठ्यांना येण्यास काढायला लागले काय हे सरकार काहिच करत नाही. साधे त्यांच्याचाने गुन्हे माघारी घेतले होइना. तुम्ही मराठ्यांच्या धैर्य ला डवचाडवच करु नका.

तुम्हाला लाखो करोडो करणार्यांचे घोटाळे तुम्ही एका दिवसात माफ करतात, अजित पवार छगन भुजबळ अशोक चव्हाण यांच्यावर लाखो करोडो रुपयांची घोटाळे आहेत पण यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला की यांचे घोटाळे गायब, एका दिवसात क्लिन चिट मग आमच्या लेकरांनी कोणता गुन्हा केलाय 26 जानेवारी ला म्हणाले गुन्हा वापस घेऊ. आता जवळपास 20 दिवस होत आले आहेत. गुन्हा वापस घेण्याबाबत चर्चा सुद्धा केली नाही. 

पाटलांना बदणाम करण्याचा प्रयत्न

Manoj Jarange Patil latest News
Manoj Jarange Patil latest News image credit the economic times

जेव्हा पाटलांसोबत संपूर्ण मराठा समाज मुंबई च्या दिशेने निघाला होता तेव्हा ते लोणावळ्यामधे असताना त्यांना एका बंद खोलीत नेण्यात आले.आणि ते तिथे मॅनेज झाले काहीतरी पैसे घेतले. असे आरोप काही विरोधकांनी केला. काहीजण म्हणाले पाटील मॅनेज झाले आपण मुंबई ला जाउन काहीच मिळाले नाही पाटील फक्त एक कागद घेऊन आले आरक्षण चे नामोनिशाण नाही.

जरांगे पाटील पाण्यासारखे पवित्र आहेत

जरांगे पाटील यांच्यावर जे आरोप जे कलंक लावण्याचा मराठ्यांची एकजूट फोडण्यासाठी जे षडयंत्र केले आहे ते प्रयत्न कधीच पूर्ण होणार नाहीत. यामुळे पाटील 10 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाला बसले त्यांच्यावर आरोप हे ते कधीच सहन करणार नाहीत पाटील मरण स्वीकारतील पण मॅनेज होणार नाहीत. मॅनेज होयचा वेळ गेला पाटील विकले जाउच नाही. जो माणूस आपल्या जिवाची पर्वा न करता एकटा असंख्य शत्रूशी लढत आहे त्या माणसाला मराठ्यांची साथ हवी आहे.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

 

आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांनी पाच दिवसापासून अन्न पानी न पिण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची तब्येत आज खालावली आहे . त्यांच्या नाका मधुन रक्त येत होते. काही डॉक्टर त्यांच्याकडे तपासणी साठी आले होते. पण मनोज जरांगे पाटील यांनी तपासणी साठी सक्त विरोध केला. नंतर डॉक्टर म्हणाले ही अत्यंत चिंताजनक बाब आहे पाटलांना उपचाराची गरज आहे. खुप लोकांनी आग्रह केल्यानंतर पाटील उपचारासाठी तयार झाले. आणि त्यांनी सलाइन चालू केली.

आज बिडसह महाराष्ट्र बंद

मनोज जरांगे पाटील याची तब्येत खालावलेली असताना संपूर्ण मराठा समाजाच महाराष्ट्र बंद ची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आज बिड, धाराशिव, संभाजीनगर, बारामती सह अनेक जिल्ह्यात कडकडीत बंद होते. सर्व शाळा, महविद्यालय, दुकाना स्टोल सर्व बंद होते.

संघर्ष योद्धाच्या टीमने साथ दिली

मनोज जरंगे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्ष योद्धा’ या चित्रपटाच्या टीमने मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांनी ‘संघर्ष योद्धा’चे शूटिंग आज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणामुळे मनोज जरंगे यांची प्रकृती खालावली आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी केले आहे. तर,

राज्य सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी संचालक शिवाजी दोलताडे यांनी केली. या चित्रपटात रोहन पाटील मुख्य भूमिकेत आहे.

निष्कर्ष

Manoj Jarange Patil latest News या लेखामध्ये आपण मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही लोकांनी षडयंत्र करून मराठी लोकांत फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण पाटलांना मराठा समाजाची साथ आहे.

Leave a Comment