अंगणवाडी ताजी बातमी 2024 : खुशखबर आता बीडमध्ये 3 हजार अंगणवाडी कर्मचार्यांना मिळणार नवीन स्मार्टफोन

अंगणवाडी ताजी बातमी 2024: 3 हजार कर्मचार्यांना मिळणार नवीन स्मार्टफोन ही बातमी वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे. गेल्या मागच्या महिन्यात अंगणवाडी सेविकांनी आपल्या काही मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. शेवटी राज्यात जवळपास 2 महीन्यापासुन चालू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपावर उपाय निघाला आहे. अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना हे स्मार्टफोन भेटणार आहेत.

अंगणवाडी ताजी बातमी 2024

अंगणवाडी ताजी बातमी 2024
अंगणवाडी ताजी बातमी 2024

अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानावर संप केल्यानंतर राज्य सरकारने बर्याच मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच काही मागण्या त्यांना मिळणार नाही हे सुद्धा जाहीर केले. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आता एक नवीन स्मार्टफोन दिला जाणार आहे. सपूर्ण बिड जिल्ह्यातील 3090 अंगणवाडी सेविका व 84 पर्ववेक्षीका यांना नवीन स्मार्टफोन मिळणार आहेत. अंगणवाडी सेविकांना या मोबाईल चा वापर दैनंदिन काम करण्यासाठी करता येईल

अंगणवाडी सेविकांना 2018-2019 या वर्षात पोषण आहार कार्यक्रमांतर्गत दैनंदिन कामकाजासाठी मोबाइल दिले जात होते. मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप इंस्टोल करून त्या ॲपद्वारे हजेरी, लाभार्थी यादी, स्तनदा माता, पोषण आकारांचे वाटप, गर्भवती माताची माहिती त्यांचे वजन, उंची इत्यादी आवश्यक माहितीची नोंद करावी लागत होती. हि माहिती कलेक्ट करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आला होता.

परंतु, या मोबाईलमध्ये काही समस्यांचा तक्रारी वाढत गेल्या होत्या. त्यामुळे आंदोलन करणार्या अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारला मोबाईल वापस केले होते. नंतर 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांना बंद केल्यानंतर यामध्ये  शासनाने दखल घेतली. शेवटी हा संप संपला. यानंतर बसावे लागेल कि आता अंगणवाडी सेविकांना नवा मोबाइल कधी मिळणार?

अंगणवाडी सेविकांसाठी स्मार्टफोन चे काय काय फायदे आहेत

अंगणवाडी सेविकांना  सरकारकडून जे नवीन स्मार्टफोन देण्यात येणार आहेत त्यामध्ये अनेक अंगणवाडी रिलेटेड ॲप नव्याने समाविष्ट करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना काम करणं अगदी सोपं होणार आहे. अंगणवाडी सेविकांना कामाचा अहवाल रोजच्या रोज द्यावा लागतो.

अंगणवाडी सेविकांसाठी हे मोबाईल फोन फायदेशीर ठरतील. शहरी आणि ग्रामीण सेविकांना सुद्धा या स्किमचा लभ घेता येणार आहे. नविन स्मार्टफोन अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे म्हणून त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.

अंगणवाडी सेविकांनी संपाचे आवाहन का केले होते

यापुर्वी 2018-19 या वर्षात मिळालेल्या चिनी स्मार्टफोनचा दर्जा अत्यंत वाईट होता त्यात अप्लिकेशन लोडींग ला खूप वेळ लागायचा आणि तो मोबाईल हैंग देखील होत असे. त्यामुळे ते फेकून द्यावे लागले. या दोषयुक्त मोबाइलमुळे अंगणवाडीसेविकांना स्वतःचे फोन वापरावे लागत व त्याची मोबाईल ची बिल मिळण्यास अनेक महिने लागत. एका साइटला कमी पगार दुसरीकडे मोबाईल बिलांचा ताप दुहेरी संकटामुळे अंगणवाडी सेविकांच्या डोक्याला ताप झाला आहे.या सर्व गोष्टी चे सरकारने विचार केला.

अंगणवाडी सेविका याना येणार्या अडचणी

कामाचा ओव्हरलोड, अवाजवी रेकॉर्ड मेंटेन, अपुरे मानधन, पायाभूत सुविधांशी संबंधित, लोजिटिक पुरवठा संबंधित अपुरी पर्यवेक्षण आणि समुदायाकडुन मदतीचा अभाव इत्यादी अडचणी अंगणवाडी सेविकांना येत असे.

अंगणवाडी सेविका यांची मागणी

  • आंदोलक कामगार आणि मदतनीसांनी त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून वागणूक द्यावी
  • पगारवाढ आणि ग्रॅच्युइटीची तरतूद करावी
  • सेवानिवृत्तीचे वय इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वाढवून ६२ करावे

 निष्कर्ष 

अंगणवाडी ताजी बातमी 2024 या लेखात आपण खालील माहिती जाणून घेतली आहे. अंगणवाडी सेविकांना येणार्या अडचणी त्यांच्या मागण्या आणि सरकारने त्यांच्यासाठी मोबाईल ची मागणी मान्य केली आहे .या मोबाईल मागणी बाबत अंगणवाडी सेविका खूप आनंदीत आहेत.

Leave a Comment